तभा वृत्तसेवा
पुसद,
rupesh-jadhav : राष्ट्रीय बंजारा महासंघाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी आणि समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी यवतमाळ जिल्हा सरचिटणीसपदी रुपेश हजारी जाधव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. महासंघाच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
रुपेश जाधव यांनी आजवर सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रीय बंजारा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.