पातूर,
child abuse तालुक्यात एका 60 वर्षीय वृद्धाने 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावातील 60 वर्षीय वृद्धाने त्याच्या घरालगत राहणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. मुलीचे आई-वडील शेतात मजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवस वारंवार अत्याचार केला.
सुरवातीला पीडित दहा वर्षीय मुलीने घाबरून हा प्रकार घरी सांगितला नाही . मात्र, मंगळवारी पीडित मुलीने ही बाब आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर यासंदर्भात चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.child abuse यासंदर्भात वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला असल्याचे दिसून आले. पोलिसांची तीन पथक आरोपींच्या शोधासाठी गठीत केले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.