पोलिस उपविभागाच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील 175 भोंगे हटवले

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
unauthorized-religious-place-horns-removed : पोलिस उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्वच पोलिस ठाणे हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचे काम प्रगतिपथावर असून 175 धार्मिक स्थळांवरील भोंगे हिंदू, मुस्लिम, बौद्ध विश्वस्तांनी हटवले आहेत. ही कारवाई सामंजस्याने, धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता केल्याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन यांनी संबंधित ठाणेदारांचे कौतुक केले. हटवलेले भोंगे पुन्हा लावल्यास तेथील ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकाèयाला जबाबदार धरले जाईल, अशीही तंबी देण्यात आली.
 
 

y6May-Bhonge 
 
 
 
ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, नुसार सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पिकर किंवा भोंग्यांच्या वापरावर कडक निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास भोंगे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. असे धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे तत्काळ हटवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिले होते. त्या आदेशांन्वये सहायक पोलिस अधीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनात पुसद पोलिस उपविभागातील चारही पोलिस ठाणे हद्दीतील संबंधित प्रभारी पोलिस अधिकाèयांनी कारवाई करून आपल्या हद्दीतील अनधिकृत स्थळांवरील भोंगे काढले आहेत.
 
 
पुसद पोलिस उपविभागात कोणत्याही धार्मिक स्थळांवर अनधिकृतपणे भोंगे, लाउडस्पिकर लावले असतील तर नागरिकांनी स्वतः काढून पोलिसांना सहकार्य करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई होईल, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.