नागपूर,
Pragya Buddha Vihara बौद्ध महिला विकास मंडळ व प्रज्ञा बुद्ध विहार, जवाहरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमेनिमित्त जुना सुभेदार लेआउट येथे तीन दिवसीय बुद्ध महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे शाखा सर्वाधिकारि तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. लोकप्रबोधनपर भाषण करताना त्यांनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. “महापुरुषांचे विचार डोक्यावर नव्हे, तर डोक्यात घ्या; ते आचरणात आणल्यास आपले जीवनच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात अशोक सरस्वती यांनी त्रिगुणी वैशाख बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमात शोभा पाटील व गौतम पाटील दाम्पत्याने “मी रमाई बोलतेय” हा नाट्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.Pragya Buddha Vihara तसेच डॉ. सुनिल भगत व इतर कलाकारांनी भीमगीत व बौद्ध गीतांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. विशाखा मेश्राम यांनी केले, तर मंगला गाणार यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी चंद्रमणी रामटेककर, खोब्रागडे,पाटील दाम्पत्य, डांगेबंधू, गेडाम दांपत्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला.
सौजन्य :ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र