पुण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याची महापौरांची मागणी

    दिनांक :06-May-2026
Total Views |
पुणे
Pune security concerns शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महापौर मंजुषा नागपुरे यांनी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याबरोबरच सुरक्षारक्षकांची सक्तीने पडताळणी करण्याची मागणी केली आहे. अलीकडेच शहरातील नसरापूर आणि पर्वती परिसरात घडलेल्या गंभीर घटनांच्या अनुषंगाने त्यांनी पोलीस प्रशासनासोबत बैठक घेत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
 

Pune security concerns 
महापौरांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सध्यस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद केले. अनेक ठिकाणी कॅमेरे बंद अवस्थेत असून त्यामुळे गुन्हे रोखण्याच्या तसेच तपास प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील सर्व सीसीटीव्ही यंत्रणेचे तातडीने ऑडिट करून बंद कॅमेरे कार्यान्वित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.यासोबतच निवासी संकुले, व्यापारी आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षारक्षकांची पोलिसांकडून पडताळणी अनिवार्य करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. कोणत्याही व्यक्तीस योग्य पडताळणीशिवाय सुरक्षा सेवेत काम करण्यास परवानगी देऊ नये, तसेच यासाठी कठोर अंमलबजावणी यंत्रणा उभारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर नागपुरे यांनी Pune security concerns  नागरिकांच्या सहभागालाही तितकेच महत्त्व दिले आहे. शेजार पाळत, भाडेकरूंची माहिती देणे आणि संशयास्पद हालचालींची तत्काळ माहिती पोलिसांना देणे याबाबत नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांचे समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे महापौरांनी अधोरेखित केले असून, नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.