नागपूर :
Sant Kaikadi Maharaj Samaj Bhawan भगवान नगर, रामेश्वरी रोड येथील बॅनर्जी लेआऊटमधील संत कैकाडी महाराज समाज भवन व उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याच्या कडेला व उद्यानाजवळ टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
साचलेल्या कचऱ्यामुळे डास-माश्यांचे प्रमाण वाढून आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.तात्काळ कचरा हटवून नियमित स्वच्छता करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र