अनिल कांबळे,
नागपूर,
traffic-policeman-beaten : वाहतूक नियमन करीत असलेल्या महिला पाेलिस हवालदाराने एका दुचाकीचालकाला अडविले. त्याच्यावर चालान कारवाई करीत असताना दाेघांमध्ये वाद झाला. त्या वादात वाहनचालकाने वाहतूक पाेलिस कर्मचाèयाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी शताब्दी चाैकात घडली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अजनी पाेलिसांनी इन्जमामुल कलीमखान (33) रा. सुंदरनगर, बहादुरा राेड यास अटक केली.
4 मे राेजी वाहतूक शाखा अजनीच्या महिला पाेलिस हवालदार मालती आत्माराम पाल (56) यांची शताब्दी चाैकात ड्युटी हाेती. घटनेच्या दिवशी त्या आपले कर्तव्य बजावित असताना इन्जमामुल हा चुकीच्या दिशेने आला. त्यामुळे हवालदार पाल यांनी त्याला थांबविले. त्याच्यावर कारवाई करीत असताना ताे संतप्त झाला. त्याने पाल यांना शिवीगाळ करीत त्याच्याजवळील बाेरीने पाल यांच्या डाेक्यावर आणि हातबुक्कीने मारहाण करून धमकी दिली. त्याचप्रमाणे शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी पाल यांच्या तक्रारीवरून अजनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून इन्जमामुल यास अटक केली.
बाॅडी वाेर्न कॅमेरा असता तर...
वाहतूक पाेलिसांनी चालान कारवाई करताना बाॅडी वाेर्न कॅमेरा वर्दीवर लावावा, अन्यथा केलेली कारवाई अवैध ठरविण्यात येईल, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाेलिसांना दिले आहेत. तरीही पाेलिस विना कॅमेरा कारवाई करीत असल्यामुळे नागरिकांसाेबत वाद हाेत असल्याचे प्रकार समाेर येत आहेत.