तभा वृत्तसेवा
पुसद,
dinesh-suryavanshi : येणारी प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेऊन सर्व जागा जिंकण्याचा संकल्प पुसद जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा प्रभारी दिनेश सूर्यवंशी यांनी केला. पुसद येथे भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत विविध आघाड्यांच्या संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रमांचा आराखडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी संवाद, समन्वय आणि संघटन मजबूत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीत शासकीय योजनांची अंमलबजावणी, विकासकामांच्या गतीविषयी माहिती घेऊन आगामी महिन्यांत पक्षविस्तार, बूथस्तरावरील उपक्रम, जनसंपर्क मोहिम यांना गती देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पुसद जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा जलद निपटारा व्हावा, नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी पक्ष नेतृत्वाने विशेष निर्देश दिले. संपूर्ण बैठक उत्साहात पार पडली आणि भारतीय जनता पार्टी पुसद जिल्हा यांनी विकासकार्यांसाठी व संघटन बळकटीसाठी दृढ संकल्प व्यक्त केला.
पुढील टप्पा कार्यकर्ता आणि पदाधिकारी लोकप्रतिनिधी नेते मिळून भाजपाच्या संघटन आणि राजकीय बळकटीसाठी मोठ्या प्रमाणावर शक्ती केंद्र तसेच बूथ स्तरावरील दौèयांचे संवाद सत्राचे आयोजन. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामासाठी एक हात या तत्त्वावर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाèयांना एका कामाचे वाटप करण्यात आले. काहींना विविध जबाबदारीचे प्रभारी बनवण्यात आले.
आता मंडळ भाजपाची बैठक दर महिन्याला 1 ते 7 तारखेच्या आत पूर्ण करायची आणि जिल्हा भाजपाची बैठक दर महिन्याला 8 ते 15 तारखेच्या आत आयोजित करायची या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेवरून वेळापत्रक तयार करण्यात आले. शासनाच्या योजना व कल्याणकारी कार्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी पुढील टप्प्यात नियोजन करणार आहे.
1 आणि 2 मे या दोन दिवसांत मी मला भारतीय जनता पार्टीने प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेल्या पुसद जिल्ह्यात विविध सहा बैठकांमध्ये सहभागी झालो. जिल्हा कोअर समिती, मंडळ अध्यक्ष महामंत्री, विस्तारित जिल्हा कार्यकारणी, प्रमुख अनुभवी कार्यकर्ता तसेच लोकप्रतिनिधी, मन की बात आणि एसआयआर नियोजन बैठका व विचार परिवारातील कार्यकर्ते, पदाधिकारी अशा विविध बैठका झाल्या.
या दौèयात आमदार किसन वानखडे, पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, संघटन महामंत्री महेश काळेश्वरकर, महामंत्री अॅड. आदित्य माने, दत्ता राहणे, माजी आमदार नामदेव ससाणे, निखिल चिद्दरवार, महादेव सुपारे, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार व प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा माजी अध्यक्ष उत्तम इंगळे, जिल्हा महिला आघाडी जयश्री राठोड, युवा जिहाध्यक्ष रोहित वर्मा, दत्ता काळे, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व आमदार लोकप्रतिनिधी विविध मंडळांचे अध्यक्ष, जिल्ह्यातील संपूर्ण नगरसेवक, अनुभवी कार्यकर्ते उपस्थित होते.