वॉशिंग्टन,
us-attack-on-drugs : ड्रग्स तस्करीविरोधात अमेरिकेने सुरू केलेल्या कारवाईत आता आणखी एक मोठी घटना घडली आहे. पूर्व पॅसिफिक महासागरात संशयित ड्रग्स बोटीवर अमेरिकन सैन्याने हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली असून या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकन सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी समुद्रातील संशयित बोटींना लक्ष्य केले आहे. याआधी कॅरिबियन समुद्रात झालेल्या हल्ल्यातही दोन जण ठार झाले होते.
अमेरिकन प्रशासनाने लॅटिन अमेरिकन भागात ड्रग्स वाहून नेणाऱ्या बोटींविरुद्ध मोठे लष्करी अभियान सुरू केले आहे. या मोहिमेपासून आतापर्यंत अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे.
या कारवाईवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर वादही निर्माण झाला आहे. काही तज्ज्ञ आणि मानवाधिकार संघटनांनी या हल्ल्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत, कारण या बोटींमध्ये खरंच ड्रग्स होते का याबाबत ठोस पुरावे सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
तरीही अमेरिकन प्रशासनाने ही कारवाई ड्रग्स तस्करी आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.