यवतमाळ अर्बन बँकेतर्फे बसस्थानकावर पाणपोई

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-urban-bank : बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याचे थंड पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने यवतमाळ अर्बन बँकेतर्फे मंगळवार, 5 मे रोजी बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
 
 
y6May-Panpoi
 
 
 
याप्रसंगी आगारप्रमुख पराग ढोबळे म्हणाले, यवतमाळ अर्बन बँक नेहमी समाजाविषयी आपले दायित्व सेवेच्या माध्यमातून पूर्ण करीत असते. दरवर्षी बसस्थानकात ग्रामीण भागातील प्रवाशांकरिता थंड पाण्याची व्यवस्था बँक करीत असते.
 
 
यावेळी अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे म्हणाले, यवतमाळ अर्बन बँकेतर्फे सेवाभावी तत्त्वातून एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी ही थंड पाण्याची व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाचे संचालन रवी सातपुते यांनी केले, तर आभार स्वप्नील तडगपल्लेवार यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे संचालक नरेंद्र देशपांडे, राजेंद्र खोतकर, श्याम दाणी, गजानन वैद्य, आनंद धवनेे, अविनाश दाणी, बँक व एसटी कर्मचारी उपस्थित होते.