बिहारमध्ये सत्तेचा नवा अध्याय सुरू

नव्या मंत्र्यांचा शपथविधी

    दिनांक :07-May-2026
Total Views |
पाटणा,
A new chapter of power begins in Bihar बिहारमधील राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या भव्य सोहळ्यात अनेक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या विस्तारानंतर राज्यातील सत्तासमीकरणांबाबत नव्या चर्चांना वेग आला आहे.राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात भाजप आणि जनता दल या दोन्ही पक्षांच्या आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्रिमंडळात अनेक जुन्या चेहऱ्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या विस्तारातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
 
 

cvgtry676 
सोहळ्यासाठी गांधी मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. “विकसित भारत, विकसित बिहार” अशा घोषणांनी परिसर सजवण्यात आला होता. कार्यक्रमाला नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये खातेवाटपावर चर्चा सुरू असून पुढील काही दिवसांत त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विस्तारामुळे बिहारमधील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी राजकीय रणनीतींसाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.