रस्ते अपघातात दाेन ठार : तीन जण गंभीर

    दिनांक :07-May-2026
Total Views |
मानकापूर-कळमन्यात अपघात
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Accident in Mankapur-Kalamanya शहरात कळमना आणि मानकापूर पाेलिस हद्दीतील दाेन वेगवेगळ्या ठिकाणी बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या दाेन रस्ते अपघातांत दाेन जणांचा मृत्यू झाला तर यात आणखी तिघेजण गंभीर जखमी झाले. या दाेन्ही प्रकरणांत आराेपी वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
 
acc
 
यातील पहिली घटना कळमना पाेलीस ठाणे हद्दीत जबलपूर महामार्गावरील पावनगाव पुलाजवळ घडली. यात रेश्मा चंद्रशेखर पाचे (47) रा. न्यू येरखेडा, कामठी या त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाने मित्र सूरज लक्षणे यांच्यासह जात असताना कारने त्यांच्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. या अपघातात रेश्मा पाचे व सूरज लक्षणे गंभीर जखमी झाले. रेश्मा पाचे यांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सूरज लक्षणे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
Accident in Mankapur-Kalamanya दुसरी घटना मानकापूर पाेलिस ठाणे हद्दीतील कल्पना टाॅकीज चाैकात घडली. आर्यन दीपक जैस्वाल हे त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाने घरी जात असताना पल्सर माेटारसायकलस्वार मनाेहर दिवाकर कुबडे (27, रा. उमरेड) याने भरधाव वेगात आर्यन यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात आर्यन जैस्वाल, मनाेहर कुबडे आणि त्याचा मित्र मुकेश उईके हे तिघेही गंभीर जखमी झाले. मनाेहर कुबडे याला मेयाे रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. उर्वरित दाेघांवर उपचार सुरू आहेत. या दाेन्ही अपघात प्रकरणी पाेलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.