मनुष्यबळाचा अधिक प्रभावी वापर
नागपूर,
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने लोकोमोटिव्हच्या देखभालीसाठी 'Advanced in-situ' maintenance system प्रगत इन-सिटू’ देखभाल प्रणाली सुरू करत कार्यक्षमतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. या उपक्रमाचा उद्देश लोकोमोटिव्हचा डाउनटाइम कमी करणे, मनुष्यबळाचा अधिक प्रभावी वापर करणे आणि उपलब्धता वाढवणे हा आहे.
'Advanced in-situ' maintenance system या नव्या प्रणालीमध्ये स्लाइडिंग मेकॅनिझमसह फरिदाबाद येथील गर्वी यांनी पुरवलेला ५० टन क्षमतेचा हायड्रॉलिक पॉवर पॅक समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे नियोजित देखभालीदरम्यान हेलिकल संप्रंग्स, अॅक्सल बॉक्सेस आणि रेसर्स यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची दुरुस्ती व बदल जागेवरच करणे शक्य झाले आहे. त्यामुळे लोकोमोटिव्हला बॉडी उचलण्यासाठी ’हेवी लिफ्टिंग बे’मध्ये नेण्याची गरज उरलेली नाही.
बिघाड आढळताच दुरुस्ती शक्य
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वेळ आणि श्रमाची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बिघाड आढळताच त्वरित दुरुस्ती करणे शक्य होत आहे. परिणामी, लोकोमोटिव्हचा ’टर्नअराउंड टाइम’ लक्षणीयरीत्या सुधारला आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, नागपूर विभागाने ३ रेसर्स, ५ अॅक्सल बॉक्सेस आणि ४ लोकोमोटिव्हमधील हेलिकल सप्रंग्स यशस्वीरित्या बदलण्याची कामगिरी केली आहे.