बाजार समितीने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी

    दिनांक :07-May-2026
Total Views |
राजेश आडे यांचे बाजार समितीला निवेदन

आर्णी, 
मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे आर्णी Agricultural Produce Market Committee कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांचा माल पावसात भिजून झालेल्या नुकसानग‘स्त शेतकर्‍यांना तत्काळ भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राजेश आडे आणि शेतकर्‍यांनी बुधवार, ६ मे रोजी बाजार समितीच्या कार्यालयात दिले. मंगळवार, ५ मे रोजी आर्णी समिती परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांनी विक‘ीसाठी आणलेला गहू, हरभरा, तूर इत्यादी शेतमाल उघड्यावर असल्याने पूर्णतः भिजला. त्याच वेळी व्यापार्‍यांचा माल शेडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला. मात्र शेतकर्‍यांच्या मालाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
 

bazar samiti 
 (संग्रहित छायाचित्र )
 
या घटनेमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून भिजलेल्या मालाची खरेदी करण्यास व्यापार्‍यांनी नकार दिल्याचे कळते. यामुळे परिस्थिती अधिकच बनली आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती व बाजारभावातील अनिश्चिततेमुळे अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांवर हा दुहेरी आघात झाला आहे. भिजलेल्या शेतमालाचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई जाहीर करावी. बाजार समिती प्रशासन व संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर योग्य कारवाई करावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शेतकर्‍यांच्या मालासाठी कायमस्वरूपी शेड व सुरक्षित साठवणूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, मागण्या करण्यात आल्या आहेत.
 
 
 
Agricultural Produce Market Committee  भिजलेल्या मालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा, शेतकर्‍यांच्या वतीने तीव‘ आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून शेतकर्‍यांनी दिला. हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते व माजी कामगार उपायुक्त राजेश आडे, अविनाश ढाकुलकर, नंदू देशमुख, गोपाळ कोटमकर, सचिन धाये, अनिल कोळेकर, संतोष जयस्वाल, विजय सोळंकी, बाबाराव खोडणकर, एकंडवार, रमेश कोरटकर, हिरासिंग चव्हाण, अमित रामटेके, मनोज चांडक, अजाब सलामे, भारत बैस, खेमसिंग राठोड, अनिल चौधरी, संजय लिंगडवार, प्रमोद चोपडे, किशोर शेलुकार या शेतकर्‍यांनी आर्णी बाजार समितीला निवेदन दिले.