मुंबई
Akshay Kumar बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. आता अक्षय कुमारच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय सध्या रुग्णालयात ऍडमिट असून त्याच्या डोळ्याची सर्जरी करण्यात आली आहे. या सर्जरीमुळे त्याने आगामी सिनेमाच्या शूटिंगमधून ब्रेक घेतल्याचे म्हटले जात आहे
बुधवारी 6 मे 2026 रोजी अक्षयच्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी एक छोटी सर्जरी करण्याल आली आहे. त्याला डोळ्याने पाहताना त्रास होत होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.अक्षयला गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांचा त्रास जाणवत होता. अक्षय कुमारवर व्हिजन करेक्शन सर्जरी झाली आहे. ही सर्जरी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पार पडली.सर्जरीच्या एक दिवस आधी अक्षयने चित्रपट दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या आगामी चित्रपटाचं केरळमधील चित्रीकरण पूर्ण केले या चित्रपटात त्याच्यासोबत विद्या बालन Akshay Kumar आणि राशी खन्ना मुख्य भूमिकत आहेत. या चित्रपटांच शूटिंग शेड्यूल संपवून मुंबईत परतल्यानंतर लगेचच डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याने काही दिवस आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याच्या शस्त्रक्रियेबद्दल समजताच चाहत्यांमध्ये चितेंचं वातावरण आहे. सध्या त्याचे हैवान, गोलमाल 5, वेलकम टू द जंगल आणि वेडात मराठे वीर दौडले सात हे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.