अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार
पुसद,
Atrocity and POCSO cases एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवुन नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा गुन्हा सिद्ध झाल्याने १० वर्षांची शिक्षा सुनावली असून अॅट्रॉसिटीचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचा ऐतिहासिक निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल पुसदचे जिल्हा व सत्र न्यायधीश शरनजित रामगडिया दिला. या प्रकरणात शासनाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. रवी रूपुरकर यांनी युक्तीवाद केला होता.
अमोल मांगीलाल राठोड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमोलने एका अल्पवयीन मुलीस २४ नोव्हेंबर २०१५ रोजी फूस लावून पळवून नेले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याबाबत पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अमोलविरुद्ध नोव्हेंबर २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे या प्रकरणामध्ये पीडित मुलीच्या बयानानंतर आरोपीविरुद्ध ११ फेब‘ुवारी २०१६ रोजी वाढीव कलमांसह व अनुजाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
Atrocity and POCSO cases हे प्रकरण न्यायालयात पुराव्यासाठी आला असता शासनाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. रवी रूपुरकर यांनी ९ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. परंतु कायदेशीर तरतुदींनुसार न्या. शरनजीत रामगडिया यांनी बुधवार, ६ मे रोजी आरोपी अमोल राठोड याला विविव्ध कलमांन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड जन्मठेप व २५ हजार रुपये दंड अशा शिक्षा ठोठावल्या. दंडाच्या रकमेपैकी ६० हजारांची रक्कम पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा प्राथमिक तपास सहपोलिस निरीक्षक वनदेव कापडे आणि संपूर्ण तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केला होता.