बुद्ध पौर्णिमेला ८५० वन्यप्राण्यांची नोंद

४ वाघ, १४ बिबटचा समावेश

    दिनांक :07-May-2026
Total Views |
वर्धा,
bor tiger project बोर व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून निसर्ग अनुभव उपक्रम पार पडला. या उपक्रमासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या ४५ मचाणींवरून ८० पर्यटकांनी रात्रभर जंगलात राहून पाणवठ्यांवर आलेल्या वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या. या दरम्यान एक वाघीण व तिचे ३ बछडे, १४ बिबटसह ८५० वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कवडस वनपरिक्षेत्रात येणार्‍या भानगडी तलाव परिसरात अस्वल, १५ रानडुकर, मसन्या उद, मोर, खापाखोरी पानवठ्यावर बिबट, अस्वल, ५ चितळ, ४ सांबर, रानडुकर, चौकी पानवठ्यावर सांबर, ६ रानडुकर, २ निलगाय, ६ मोरांचे दर्शन झाले.
 
 
बुद्ध पौर्णिमेला ८५० वन्यप्राण्यांची नोंद
 
हिंगणी वनपरिक्षेत्रात येणार्‍या उमरविहिरी तलाव परिसरातील पानवठ्यावर २ चितळ, ९ रानडुकर, ससा, ११ निलगाय, सायाळ, २ मोर, मुंगुस, मेट तलाव परिसरातील पानवठ्यावर ९ रानडुकर, ४ निलगाय, सायाळ, मोर, बुदलागड पानवठ्यावर ४ चितळ, ११ रानडुकर, ५ निलगाय, २ सायाळ, मुंगुस, पंचधारा पानवठ्यावर बिबट, २ अस्वल, ८ चितळ, ३२ रानडुकर, ४ माकड, ससा, २२ निलगाय, बशी टाके सोलर भागातील पानवठ्यावर ३ सांबर, ३ माकड, २ निलगाय, २ मोर, मुंगूस व मदना तलाव पानवठ्यावर ५ चितळ, ६ सांबर, ४० रानडुकर, २५ माकड, ससा, निलगाय, माळेगाव ठेका झोपडी परिसरातील पानवठ्यावर २ सांबर, १७ रानडुकर, ६ माकड, ७ निलगाय, सायाळ, ४ मोराचे दर्शन झाले.
 
वानरकुंड परिसरातील पानवठ्यावर अस्वल, सांबर, निलगाय, लाहोरी पानवठ्यावर वाघीण व तिचे ३ बछडे, बिबट, सांबर, ब्राह्मणवाडा पानवठ्यावर बिबट, ४ अस्वली, सांबर, ३० रानडुकर, साळींदर तर पांजरा गोंडी पानवठ्यावर माकड, निलगाय व येटाली पानवठ्यावर बिबट तसेच ब्राह्मणवाडा पाटी पानवठ्यावर एका अस्वलीचे दर्शन झाले. तुलाना कुटी भागातील पानवठ्यावर सांबर, ७ रानडुकर, २ मोरांची नोंद घेण्यात आली.
 
हेटी तलाव परिसरातील पानवठ्यावर २ चितळ, ७ सांबर, चिचबन भागातील पानवठ्यावर ३ अस्वल, सांबर, १० माकड, ६ निलगाय, २० मोर, रानमांजर, पालटीन डोब भागातील पानवठ्यावर १५ सांबर, ११ माकड, ६ निलगाय, नवरगाव तलाव भागातील पानवठ्यावर अस्वल, ४ रानडुकर, २ मोर, लंगुर तर पॅच नंबर ४ भागातील पानवठ्यावर २० चितळ, १० सांबर तसेच गरमसूर मार्ग भागातील पानवठ्यावर बिबट, सांबर, सोंडी कुटी भागातील पानवठ्यावर अस्वल, चितळ, रानडुकर, मोर, सोंडी भागातील पानवट्यावर २ बिबट, अस्वल, १२ चितळ, १२ सांबर, रानडुक्कर, ४ निलगाय, २ साळींदर तसेच रवीकुंड पानवठ्यावर ३ बिबट, अस्वल, ३ चितळ, रानडुक्कर, २१ रानकुत्रे, रानमांजराचे दर्शन पर्यटकांना झाले.