मुंबई
Celina Jaitly बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरते. करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या काही अभिनेत्रींच्या आयुष्यातील संघर्षकथा पुन्हा एकदा समोर आली असून अभिनेत्री सेलिना जेटली हिच्या भावनिक पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. घटस्फोटानंतर मुलांपासून दूर राहावे लागत असल्याचा आणि कायदेशीर लढाईत अडकलेल्या वैयक्तिक आयुष्याचा तिने उघडपणे उल्लेख केला आहे.
सेलिना जेटलीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ आणि पोस्टमध्ये आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये ती मुलाच्या कबरीजवळ बसून भावनिक अवस्थेत रडताना दिसत असून, तिने आपल्या वेदना जगासमोर मांडल्या आहेत. पती पीटर हाग यांच्याविरोधात गंभीर आरोप करत तिने सांगितले की, न्यायालयाने मुलांना भेटण्याची परवानगी दिल्यानंतरही तिला मुलांना भेटू दिले जात नाही.
ऑस्ट्रियामध्ये सुरू असलेल्या घटस्फोटाच्या खटल्याचा उल्लेख करत सेलिनाने म्हटले आहे की गेल्या काही आठवड्यांपासून तिचे आयुष्य अत्यंत कठीण झाले आहे. न्यायालयात तोंडी हमी देऊनही मुलांपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप तिने केला आहे. तिने असेही सांगितले की ती फक्त एका मुलाला भेटू शकली होती, मात्र त्या मुलाचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला, ज्यामुळे तिच्या दु:खात आणखी भर पडली आहे.
या संपूर्ण परिस्थितीबद्दल बोलताना सेलिनाने भावनिक शब्दांत आपले दुःख व्यक्त केले आहे. “आई म्हणून मुलांसाठी जगले, पण आज त्यांच्यापासून दूर राहावे लागत आहे,” असे ती म्हणते. तिच्या मते, न्यायालयीन आदेश असूनही मुलांपर्यंत पोहोचता न येणे हे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे.
पोस्टमध्ये तिने पती पीटर हाग Celina Jaitly यांच्यावर मानसिक आणि भावनिक छळाचे आरोपही केले आहेत. लग्नानंतर भारतातून विविध देशांत स्थलांतर करून तिने कुटुंब आणि पतीच्या करिअरसाठी स्वतःचे करिअर बाजूला ठेवले, असे तिने नमूद केले आहे. या काळात तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि संपत्तीवरही परिणाम झाल्याचा दावा तिने केला आहे.
सेलिना जेटलीचे लग्न 2010 मध्ये पीटर हाग यांच्याशी झाले होते. त्यानंतर 2012 मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. 2017 मध्ये पुन्हा जुळ्या मुलांचा जन्म झाला, मात्र त्यापैकी एका मुलाचा ‘हायपोप्लास्टिक हार्ट कंडीशन’मुळे मृत्यू झाला. या वैयक्तिक शोकांतिकेनंतर आता घटस्फोट आणि मुलांपासून दूर राहण्याची वेळ आल्याने तिच्या आयुष्यावर आणखी कठीण प्रसंग ओढावल्याचे दिसत आहे.दरम्यान, सेलिनाच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर तिच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे. घटस्फोटाच्या कायदेशीर लढाईसह वैयक्तिक संघर्ष यामुळे तिचे आयुष्य सध्या अत्यंत कठीण टप्प्यात असल्याचे चित्र आहे.