चंदिगड
Chirag Paswan पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बिहारचे उगवते नेतृत्व समजले जाणारे लोजपाचे नेते चिराग पासवान यांनी पंजाबमधील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Chirag Paswan पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पंजाब प्रभारी डॉ. के. पी. चौधरी यांनी चंदिगड येथे ही माहिती दिली. पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आगामी 9 मे रोजी जालंधर येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवारांची निवड आणि प्रचाराच्या आराखड्यावर मंथन होईल. यानंतर स्वत: चिराग पासवान पंजाबचा दौरा करणार असून 14 जून रोजी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे एका भव्य कार्यक्रमाला संबोधित करतील. या कार्यक्रमाला सुमारे 10 हजारांवर लोक सहभागी होण्याचा अंदाज आहे.
Chirag Paswan भाजपाची सोबत शक्य
केंद्रात भाजपाचे सहकारी असलेल्या चिराग पासवान यांनी पंजाबमध्ये स्वबळाचा नारा दिला असला तरी भाजपासोबतच्या युतीचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत. युतीची शक्यता नाकारता येत नाही. कारण आम्ही केंद्रात एकत्र आहोत. अंतिम निणर्य मात्र निवडणुकीच्या वेळी होईल, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.