नागपूर,
Chitnavis Center Banyan Hall भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपण्यासाठी आणि संगीत रसिकांना सुरेल मेजवानी देण्यासाठी चिटनवीस सेंटरतर्फे विशेष शास्त्रीय व अर्धशास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही सांगीतिक मैफल शनिवार, ९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता चिटनवीस सेंटरच्या बॅनयन हॉलमध्ये रंगणार आहे.या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मौमिता मित्रा आपल्या गायनाची प्रस्तुती करणार आहेत. त्यांना तबल्यावर अजिंक्य गलांडे तर संवादिनीवर संदीप गुरूमुळे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ठुमरी तसेच लोकप्रिय नाट्यसंगीतही सादर करण्यात येणार असून, रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

कोलकाता येथील अग्रगण्य शास्त्रीय गायिका मौमिता मित्रा या ‘किराणा’ आणि ‘कोटाली’ घराण्यांच्या गायकीसाठी विशेष ओळखल्या जातात. Chitnavis Center Banyan Hall त्या ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या ‘ए-टॉप ग्रेड’ कलाकार असून देशातील अनेक प्रतिष्ठित मंचांवर त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. त्यांनी प्राथमिक संगीत शिक्षण दिवंगत पंडित ए. कन्नन यांच्याकडे घेतले असून, पुढे १३ वर्षे अंजन मुजुमदार यांच्याकडे तालीम घेतली. सध्या त्या पंडित मानस चक्रवर्ती यांचे ज्येष्ठ शिष्य सुभाशीष मुखर्जी यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. ‘ख्याल’, ‘ठुमरी’ आणि ‘दादरा’ या प्रकारांतील त्यांच्या सादरीकरणाला विशेष दाद मिळते.या संगीतमय कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आयोजकांनी शहरातील संगीतप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य:योगिता चकोले,संपर्क मित्र