‘स्पर्धात्मक दुखापती’ या विषयावर कार्यशाळा

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नागपूर, 
‘Competitive Injuries’ दरवर्षी ७ मे हा दिवस जागतिक अ‍ॅथलेटिक्स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, यानिमित्त नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन क्रीडा परिसरात करण्यात आले आहे. खेल फाउंडेशन, ड्रीम प्लॅनर, ग्रेस ऑर्थोकेअर यांच्या पुढाकाराने होणार्‍या या आयोजनास राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे सहकार्य लाभलेले आहे.
 
 
sports dsk
 
‘Competitive Injuries’  याअंतर्गत आज ५ मे रोजी ‘स्पर्धात्मक दुखापती’ या विषयावर खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी विद्यापीठाचे क्रीडा परिसरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रेस आर्थोकेअर हॉस्पिटलच्या डॉ. नेहा गोडघाटे आणि डॉ. निनाद गोडघाटे यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धात्मक बाबी आता सराव थेट सिंथेटिक ट्रॅकवर स्पर्धा धावल्यास खेळाडूला दुखापती होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते, असे त्यांनी सांगितले. त्यापुढे म्हणाल्यात की, वॉर्म अप व्यायामांच्या वेळी जनरल वॉर्म अप नंतर स्पेसिफिक वॉर्म आपल्या इव्हेंटच्या अनुषंगाने करण्यात यावा. पॅरा-अ‍ॅालिम्पियन तसेच अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त विजय मुनिश्वर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हा संघटनेचे गुरुदेव नगराळे यांनी कार्यक्रमाची अध्यक्षता केली. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ शरद सूर्यवंशी यांनी केले. उमेश नायडू आणि अमित शेंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.