शेतकर्‍यांना खरीप हंगाम पीकविमा भरपाई द्या

    दिनांक :07-May-2026
Total Views |
भारतीय किसान संघाचे तहसीलदारांना निवेदन

दारव्हा,
crop insurance कोरडवाहू शेतकर्‍यांना हेक्टरी ३५५०० आणि बागायतदार शेतकर्‍यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यातील पहिला टप्पा एनडीआरएफनुसार कोरडवाहू शेतकर्‍यांना हेक्टरी ८५०० रुपये व बागायतदार शेतकर्‍यांना २२५०० रुपये देण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात रबी हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे हेक्टरी १०००० (कमाल ३ हेक्टरपर्यंत) रुपये मदत देण्यात आली असून ती शेतकर्‍यांना प्राप्त झाली आहे. त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजनुसार खरीप हंगामातील सर्व पिकांना सरसकट हेक्टरी १७००० रुपये पीक विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, असे घोषित करण्यात आले होते.
 
 
kisan
 
crop insurance  परंतु, प्रत्यक्षात पीक विमा कंपन्यांकडून शासनाच्या घोषणेनुसार नुकसान भरपाई जात नाही. पीकविमा कंपन्या शासनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित पीकविमा कंपन्यांवर योग्य ती कारवाई करून, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी सरसकट हेक्टरी १७००० रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई शेतकर्‍यांना तत्काळ देण्यात यावी. सध्या शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना या वंचित ठेवू नये. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा, भारतीय किसान संघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी भारतीय किसान संघाचे संजय डेहणकर, सतीश मांडेकर, प्रल्हाद गावंडे आणि किसान संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.