महिलांच्या आत्मनिर्भरतेतूनच विकास शक्य: कविता गायकवाड

- ककोडीत ‘सुपर वुमन ग्राम कनेक्ट’ अभियानाचा शुभारंभ

    दिनांक :07-May-2026
Total Views |
गोंदिया, 
kavita gaikwad एका सक्षम स्त्रीमुळे संपूर्ण कुटुंब सावरले जाते आणि जेव्हा कुटुंबाची प्रगती होते, तेव्हाच खर्‍या अर्थाने गावाचा आणि देशाचा विकास होतो. महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या आरोग्यासोबतच शिक्षण आणि कौशल्याकडे लक्ष दिले पाहिजे. सुपर वुमन ग्राम कनेक्ट हे अभियान ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर करण्याची एक सुवर्णसंधी असून, यातून महिलांच्या प्रगतीची नवी गाथा लिहिली जाईल, असे प्रतिपादन देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी केले.
 
 

kavita gaikwad 
 
 
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवरी तालुक्यातील ककोडी येथील शासकीय आश्रमशाळेत ‘सुपर वुमन ग्राम कनेक्ट’ अभियानाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. सोहळ्याला आमगावचे तहसीलदार तथा स्व-गणना मोहिमेचे नोडल अधिकारी नवनाथ काठवडे, ककोडीच्या सरपंच मीना मडावी, उचेपूरच्या सरपंच सेवंता गहाणे, मेहताखेडाचे सरपंच कृष्णा सरपा, शासकीय आश्रमशाळेचे प्राचार्य मोटघरे, ’सुपर वुमन’चे संचालक प्रमोद गुडधे, संचालिका प्राची गुडधे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका संयोजिका पिंकी कटकवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संचालिका प्राची गुडधे यांनी मानले.kavita gaikwad कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारुल मोहबंशी, कंचन लाडे, मधु चौहान, उषा मोहबंशी, तामेश्वरी चौहान, संध्या कासिम, उर्वशी गौतम, रितू नान्दनकर, उर्मिला घरसिया, चांदनी शनीचरा आदींनी सहकार्य केले