धुरंदर 2 चित्रपटातील ‘त्या’ गाण्यावर 8 मे रोजी सुनावणी

नेमके प्रकरण काय?

    दिनांक :07-May-2026
Total Views |
मुंबई
Dhurandhar 2 रणवीर सिंह अभिनेता असलेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटातील ‘रंग दे लाल (ओये ओये)’ या गाण्यात 1989 च्या ‘त्रिदेव’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘तिरची टोपीवाले’ या गाण्याची चाल परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्रिमूर्ती फिल्म्सने हा आरोप केल्याने वाद निर्माण झाला असून हे प्रकरण थेट दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले आहे. त्यामुळे ‘रंग दे लाल (ओये ओये)’ या गाण्यावरून त्रिमूर्ती फिल्म्स आणि ‘धुरंधर 2’ च्या निर्मात्यांमध्ये सुरू असलेल्या कॉपीराइट वादात मध्यस्थी अयशस्वी झाली आहे. वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. यानंतर, न्यायालयाने पुढील सुनावणी 8 मे रोजी निश्चित केली आहे.
 

Dhurandhar 2 
प्रसिद्ध त्रिदेव चित्रपटात ‘तिरची टोपीवाले’ असे गाणे आहे. हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्याला आनंद – मिलिंद यांनी संगीत दिले असून आनंद बक्षी यांनी हे प्रसिद्ध गाण्याचे बोल लिहिले होते. त्यामुळे या गाण्याच्या कॉपी राइट्स त्रिमूर्ती फिल्म्सकडे आहेत. परंतु, असे असतानाही धुरंदर 2 चित्रपटातील ‘रंग दे लाल’ या गाण्याकरिता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आवश्यक परवाना न घेता हे गाणे किंवा त्याच्याशी मिळतीजुळती आवृत्ती वापरली आहे. त्यामुळे हे कॉपीराइटचे उल्लंघन आहे आणि चित्रपटाच्या थिएटरमधील प्रदर्शनात, डिजिटल प्लॅटफॉर्मवरील स्ट्रीमिंगमध्ये आणि प्रचारात्मक साहित्यात या गाण्याचा व्यावसायिक वापर करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
 
 
ज्यामुळे आता चित्रपटातील Dhurandhar 2  गाण्यांचे ऑडिओ हक्क असलेल्या सुपर कॅडेट्सने अंतरिम दिलासाला विरोध केला आहे. कंपनीचा आरोप आहे की, त्रिमूर्ती फिल्म्सने न्यायालयाला संपूर्ण सत्य सांगितले नाही आणि ‘त्रिदेव’ सारखी गाणी इतर चित्रपटांमध्ये वापरल्याच्या घटनांचा उल्लेख केला नाही. चित्रपटाचे निर्माते, बी६२ फिल्म्सने न्यायालयाला सांगितले की, ‘धुरंधर 2’ थिएटरमध्ये आधीच प्रदर्शित झाला आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता नाही. न्यायालयाने यापूर्वी हे प्रकरण लवादाकडे पाठवले होते, परंतु ती प्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर, पुढील सुनावणी आता 8 मे रोजी होणार आहे.