नागपूर,
Distribution of drinking water for passengers प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांना थंड पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळा सहण करीत असलेल्या प्रवाशांना दिलसा देण्यासाठी सामाजिक संस्थेच्या वतीने प्रत्येक रेल्वेस्थानक परिसरात आता प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आहे.
Distribution of drinking water for passengers विविध सामाजिक संस्थांनी रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने नागपूर विभागातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचे वितरण सुरू केले आहे. उष्ण हवामानात प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा देण्याचा उपक्रम पुढील काही दिवस सुरु राहणार आहे. नागपूरसह बैतूल, आमला, पांढुर्णा, बोरधई, हिंगणघाट, सेवाग्राम, वणी आणि चंद्रपूर या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना थंड पिण्याचे पाणी करून दिले जात आहे. प्रवाशांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक संस्था आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.