तलाठ्याची शेतकर्‍यांना उद्धट वागणूक

    दिनांक :07-May-2026
Total Views |
शेतकर्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार 

आर्णी, 
Farmers complain to District Collector जवळा येथूनच जवळच असलेल्या शेकलगाव येथील शेतकरी व स्थानिक प्रतिनिधींनी संबंधित तलाठी प्रशांत जाधव विरुद्ध उद्धट वर्तन व अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोप करत जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या निवेदनानुसार, सोमवार, ४ मे रोजी पिकांच्या नुकसानाबाबत माहिती घेण्यासाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला होता. यावेळी संबंधित तलाठ्याने गैरवर्तन करीत उद्धट वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. तसेच, शेतकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.
 
 
shetkari dsk
 
Farmers complain to District Collector  तक्रारदारांचे म्हणणे आहे की, गावातील काही शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्याबाबत शासनाकडून मदत मिळवण्यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, संबंधित अधिकार्‍यांकडून सहकार्य मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी मोबाइल कॉल रेकॉर्डिंगसह काही प्रशासनाकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले. गजानन जाधव, शेख शम्मी शेख रज्जाक, शेख अब्दुल शेख रज्जाक या तक्रारदारांनी याची नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
मी माझे काम योग्य केले
शेकलगावचे मुस्तफा रज्जाक शेख यांच्या वैयक्तिक खात्याने ५० चे अनुदान त्यांच्या नावावर जमा झाले. तसेच गट १९७ मुस्तफा शेख व इतर तीन यांचे अनुदान मुस्तफा शेख यांनी यांच्या नावाने खात्यात जमा कारण्यासाठी अर्ज सादर केला होता. परंतु हे नाव व आधार नंबर डबल होत असल्याने दुसर्‍या वारसाचे आधार व बँक खाते मागितले. तर त्यांनी कुचरा अब्बास या वारसाची माहिती दिली. तसेच फोनवर संवाद करून त्यांच्या खात्यात टाकण्यास सांगितले, त्याप्रमाणे मी गट १९७ चे अनुदान कुचरा यांच्या खात्यात जमा केले आहे.
प्रशांत जाधव
तलाठी, शेकलगाव