नागपूरकडून वर्धा संघ पराभूत

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नागपूर, 
football match आज कोल्हापुरातील पोलो खेळल्या गेलेल्या नागपूर व वर्धा यांच्या झालेल्या फुटबॉल सामन्यात एनडीएफए (नागपूर डिस्ट्रिक्ट) ने वर्धा संघाला ४-० गुण फरकाने पराभूत केले. आंतर-जिल्हा फुटबॉल सामन्यात आज नागपूरच्या यश शुक्ला याने २ गोल (२४ व ६०व्या मिनिटात) करीत चांगली कामगिरी केली.
 
 
football dks
 
football match तसेच मुजताब अशरफ व भूवेश शेन्द्रे यांनी प्रत्येकी १-१ गोल (६८ ८० व्या मिनिटात) केला होता. वर्धा संघाला एकही गोल करता आला नाही. शेवटी नागपूर जिल्हा संघाला विजयी घोषित करण्यात आले. उद्या नागपूरचा सामना मुंबई सोबत होणार आहे. तसेच गडचिरोली वि. पालकर, ठाणे वि. वर्धा व कोल्हापूर वि. पुणे असे सामने खेळले जातील.