विदर्भातील पहिल्या अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानाचे भूमिपूजन

    दिनांक :07-May-2026
Total Views |
खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सदैव तत्पर
पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, 
जिल्ह्यातील खेळाडू क्रीडांगण यांच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. खेळाडूंना अधिक चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच तत्पर राहील अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. ९ कोटी रुपये तयार करण्यात येणार्‍या विदर्भातील पहिल्या Groundbreaking ceremony of Astroturf Hockey Stadium अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानाचे भूमिपूजन व सिंथेटिक हँडबॉल कोर्टच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
 
 
sanjay
 
यावेळी मंचावर आमदार किसन वानखेडे, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की व जिल्हा क्रीडाधिकारी शिल्पा चाबुकस्वार उपस्थित होते. विशेष म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना यांनीही यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध क्रीडांगण विकासाच्या कामांची माहिती देत जिल्हा प्रशासन सदैव खेळाडूंच्या पाठीशी उभे असेल अशी ग्वाही दिली.
 
 
Groundbreaking ceremony of Astroturf Hockey Stadium हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक‘माची सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आकाश चिकटे, जिल्हा हॉकी सचिव मनीषा आकरे, मयूर निंबाळकर, चैताली लोखंडे, सचिन हरणे, आरती काळे व मंगेश गुडदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी प्रास्ताविक करताना, जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या विविध क्रीडा सुविधांची माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते प्रस्तावित हॉकी मैदानाचे विधिवत भूमिपूजन करण्यात येऊन हँडबॉल क्रीडांगणाचे लोकार्पण करण्यात आले. संचालन व आभारप्रदर्शन अनंत पांडे यांनी केले.
 
 
या कार्यक‘माला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विक‘ांत शिरभाते, हँडबॉल क्रीडांगणाचे कंत्राटदार मनीष कासलीकर, यवतमाळच्या क्रीडा क्षेत्रातील मान्यवर राजू जॉन, पराग पिंगळे, निलेश भगत, अविनाश जोशी, अविनाश लोखंडे, विकास शेळके, संजय कोल्हे, जितेंद्र सातपुते, डॉ. संतोषी साऊळकर, गौरव निंभोरकर तसेच हॉकी व खेळाडू मोठ्या सं‘येत उपस्थित होते.