इंस्टाग्रामरुन हायटेक देहव्यापार

    दिनांक :07-May-2026
Total Views |
- आंबटशाैकीन ग्राहकांना पाठवतात तरुणींचे फोटाे
- गणेशपेठेतील कृष्णा लाॅजवर छापा

अनिल कांबळे
नागपूर, 
High-tech prostitution देहव्यापारात गुंतलेल्या मुलींचे अश्लील फोटाे काढून इंस्टाग्रामवरील आंबटशाैकीनांना पाठविण्यात येते हाेते. ग्राहकाचा हाेकार मिळताच गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हाॅटेलवर पाठविण्यात येत होते.असा हायटेक देहव्यापार करणाऱ्या टाेळीचा गुन्हे शाखेने छडा लावला. देहव्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या टाेळीतील एकाला गुन्हे शाखेने अटक केली असून एका तरुणीची देहव्यापाराच्या दलदलीतून सुटका केली आहे.
 
 
prostitution
 
High-tech prostitution  गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ओयाे फ्लॅगशिप कृष्णा लाॅजवर छापा टाकून हा प्रकार चव्हाट्यावर आणला. या कारवाईत पीडित तरुणीची सुटका करण्यात आली. देहव्यवसायाचे रॅकेट चालवणाèयावर गुन्हा दाखल करत त्याला पाेलिसांनी अटक केली. सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख राहुल शिरे यांचे पथक बुधवारी रात्री काॅम्बिंग ऑपरेशन करत असताना त्यांना ही माहिती मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान ‘राज’ नावाचा व्यक्ती देहव्यवसायासाठी बसस्थानक परिसरातील ओयाेशी संलग्न लाॅजवर जागा आणि मुली उपलब्ध करून देत हाेता. पाेलिसांनी घटनास्थळावरून पीडित तरुणीची सुटका करत राेख 3 हजार 500 रुपये, माेबाईल असा एकूण 6 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गणेशपेठ पाेलिस ठाण्यात अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेशपेठ पाेलिसांचे माैन
बसस्थाकाजवळील काही हाॅटेल्समध्ये खुलेआम देहव्यापार सुरु असताे. हा सर्व प्रकार पाेलिसांना माहिती असताे. मात्र, हाॅटेल आणि लाॅजमालकांशी पाेलिसांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळेच या परिसरात देहव्यापार माेठ्या प्रमाणात चालताे. नागरिकांनी आणि काही ग्राहकांनी देहव्यापाराबाबत अनेकदा पाेलिसांना गुप्त माहिती दिली. मात्र, गणेशपेठ पाेलिस कारवाई करीत नसल्यामुळेच गुन्हे शाखेला कारवाई करावी लागली, अशी चर्चा आहे.