इंद्रधनूची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

जगातील पहिली दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे सन्मानित

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नागपूर,
Indradhanu Annual General Meeting इंद्रधनू ची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २६ एप्रिल रोजी प्रार्थना भवन येथे उत्साहात पार पडली. सभेला संस्थेचे प्रमुख पदाधिकारी, संस्थापक सदस्य रामचंद्र चेतानी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेची सुरुवात संस्थेची प्रार्थना, स्वागत गीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संस्थेचे माजी सचिव मनोहर उरकुडे व कार्यकर्त्या वनिता पाटील यांच्यासह स्वर्गवासी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सचिव दिलीप अलकरी यांनी सभेच्या नोटीसचे वाचन केले. संस्थेच्या अध्यक्षा कविताताई लंके यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत दिव्यांगांच्या मदतीसाठी देणगीदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.सभेत मागील इतिवृत्त, बॅलन्स शीट, जमाखर्च पत्रके, नफा-तोटा पत्रक, ऑडिट रिपोर्ट व वार्षिक अंदाजपत्रकाचे वाचन करण्यात आले. तसेच सदस्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली.
 
 

7778 
 
 
संस्थेत दीर्घकाळ कार्य करणाऱ्या आणि वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी अध्यक्षा मालती शास्त्री, सुमन बारस्कर, लालासाहेब पाटील, वसुधा साने, सुमित्रा सांबरे व कविता लंके यांचा समावेश होता.Indradhanu Annual General Meeting रामचंद्र चेतानी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह यावेळी जगातील पहिली दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. १७ वर्षीय ईश्वरी पांडे हिने ६ एप्रिल २०२६ रोजी श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुष्कोडी हा २९ किलोमीटरचा समुद्री प्रवास अवघ्या ११ तास १५ मिनिटांत पूर्ण करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. अध्यक्षा कविता लंके यांनी तिला शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन गौरविले.
सौजन्य:वर्षा किडे,कुळकर्णी,संपर्क मित्र