अनिल कांबळे
नागपूर,
sexually assault young woman इंस्टाग्रावरुन ओळख झालेल्या तरुणाने माेठ्या कंपनीत नाेकरी करणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवत तिचे लैंगिक शाेषण केले. धंताेली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही खासगी कंपनीत कार्यरत आहे. तिची तीन वर्षांपूर्वी 2023 मध्ये समाजमाध्यमावरील इंस्टाग्रामवरून गवळीपुरा, गांधीबाग परिसरातील हर्ष किशाेर बिलसे (26) याच्याशी ओळख झाली. सुरुवातीला दाेघांत मैत्री असलेले नाते पुढे प्रेमसंबंधात बदलले. हर्षने तिला लग्नाचे आश्वासन देत वेळाेवेळी तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकला. विश्वासात घेऊन अनेक वेळा संबंध ठेवल्यानंतर जेव्हा तिने लग्नाचा विषय काढला, तेव्हा हर्षने नकार दिला. पीडितेने धंताेली पाेलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नाेंदवली.sexually assault young woman पाेलिसांनी संबंधित गुन्हा दाखल केला. सध्या हर्ष फरार आहे. त्याचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा समाजमाध्यमांवरून हाेणारी फसवणूक चव्हाट्यावर येत आहे.