‘गुड न्यूज' भिडेची सोनू आई होणार? काय आहे बातमी वाचा

    दिनांक :07-May-2026
Total Views |
मुंबई
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री झील मेहता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मालिकेत ‘सोनू भिडे’ची भूमिका साकारून लोकप्रिय ठरलेली झीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. मात्र या व्हिडीओच्या सुरुवातीला निर्माण झालेला संभ्रम आणि त्यानंतरचा ट्विस्ट यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.
 

Jheel Mehta, Sonu Bhide actress, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 
झील मेहताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला ती आणि तिचा पती आदित्य दुबे हे गरोदरपणातील फोटोशूटप्रमाणे पोझ देताना दिसतात. त्यामुळे अनेक चाहत्यांना झील प्रेग्नंट असल्याचा अंदाज आला. सोशल मीडियावरही काही वेळातच ‘गुड न्यूज’ म्हणजे प्रेग्नंसी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र व्हिडीओ पुढे सरकताच झीलने या चर्चांना मजेशीर पद्धतीने पूर्णविराम दिला.
 
 
व्हिडीओमध्ये झील आणि आदित्य यांनी Taarak Mehta Ka Ooltah Chashmah नव्या घराची चावी दाखवत त्यांच्या आयुष्यातील नव्या टप्प्याची घोषणा केली. “ही आमच्या नव्या घराची गुड न्यूज आहे,” असे सांगत दोघांनी आनंद व्यक्त केला. लग्नानंतर जोडप्यांना वारंवार “गुड न्यूज कधी देणार?” असा प्रश्न विचारला जातो. त्यालाच झीलने हलक्याफुलक्या शैलीत उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.झील मेहताने डिसेंबर २०२४ मध्ये आदित्य दुबे याच्यासोबत विवाह केला होता. लग्नानंतर दीड वर्षांनी तिने ही खास आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली आहे. झीलचा पती आदित्य दुबे हा गेमिंग इंडस्ट्रीत कार्यरत असून दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात.झील मेहता ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील पहिली ‘सोनू भिडे’ म्हणून विशेष ओळखली जाते. २००८ मध्ये मालिकेच्या सुरुवातीपासून तिने ही भूमिका साकारली होती. २०१२ पर्यंत ती मालिकेचा भाग होती. शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने अभिनयक्षेत्रातून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरी तिची लोकप्रियता कायम आहे.सध्या झील ‘स्टुडंट हाऊसिंग’ क्षेत्रातील व्यवसाय सांभाळत असून ती तिच्या आईसोबत ब्युटी व्यवसायातही कार्यरत आहे. अभिनयक्षेत्रापासून दूर गेल्यानंतरही ‘सोनू भिडे’ या भूमिकेमुळे आजही झील मेहताला प्रेक्षकांकडून तितकेच प्रेम मिळताना दिसत आहे.