खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत निर्मितीला जलतरणमध्ये सुवर्णपदक

    दिनांक :07-May-2026
Total Views |
वर्धा, 
Khelo India National Championship अहमदाबाद येथे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निर्मिती वानखेडे हिने जलतरणमध्ये सुवर्ण पदक पटकावले. या यशाबद्दल रॉय अ‍ॅण्ड रॉय कंपनीचे संचालक सिद्धार्थ सवाई व त्यांच्या चमूने तिचा सत्कार केला.
 
 
khelo india
 
Khelo India National Championship  यावेळी बोलताना सिद्धार्थ सवाई म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही खेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द व मेहनत आवश्यक आहे. निर्मितीचे प्रदर्शन जिल्ह्याकरिता प्रेरणादायी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी लक्ष्मी लाईफ ग्रुपच्या संचालक रंजना वानखेडे, ओमप्रकाश वानखेडे, मनोज कोरडे, गणेश ढाले, प्रमोद ठोंबरे, जय भोयर, स्वप्निल देशमुख, विजय भांदककर, शुभांगी कोरडे, राजेश देशमुख, अनघा वानखेडे, वेद भोयर, प्रवीण वानखेडे, सुक्ष्मा वानखेडे, सतीश पवार आदींची उपस्थिती होती.