महिला मुलीवर होणाऱ्या अत्याचारा ला पोलीस प्रशासन जबाबदार : आ. रोहित पवार

    दिनांक :07-May-2026
Total Views |
बुलढाणा : 
राज्यात दीड लाख महिला मुली बेपत्ता झाल्यात लहान मुलीवर दररोज अत्याचार बलात्कार हत्या होण्याचे प्रकार वाढत आहॆ हा आकडा तेरा हजारावर गेला आहॆ या संपूर्ण घटनाचा तपास करणारी यंत्रणा गृह खात्याशी सबंधित पोलीस प्रशासन जबाबदार आहॆ मुख्यमंत्री कडे गृह खाते असल्याने त्यांना सर्वच खात्याचा अभ्यास आहॆ परंतु गृह खात्याला स्वतंत्र मंत्री असावा अशी आमची मागणी आहॆ आ. संजय गायकवाड यांनी एका महिलेचा शब्दिक वाद घालताना अपमान केला त्यांनी वाल्मिकी रामायण चे वाचन करावे केवळ बातमी होण्यासाठी राजकारण करू नये असा सल्ला राट्रावादी (श पा )युवा नेते MLA Rohit Pawar आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदे त दिला आहॆ
 
 
Rohit pawar
 
MLA Rohit Pawar  येथील राष्ट्रवादी भवन येथे दि 7रोजी सायंकाळी त्यांनी पत्रकार संवाद साधला यावेळी जिल्हाधक्ष नरेश शेळके,प्रसन्न जीत पाटील, संगितरावं भोगलं, बीटी जाधव, अनिल वर्मा उपस्थित होते. आ रोहित पवार यांनी शिवाजी कोण होता या पुस्तक प्रकाशक आंबीना बोलतांना आ गायकवाड यांनी महिलेचा अपमान केला साधू संताची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराज याचा आदर आम्ही करतो परंतु महिलाचा अपमान सहन करू शकत नाही. अजित दादा च्या विमान दुर्घटना तील व्हिएसआर कम्पनी मालकावर अद्याप कारवाई झाली नाही त्याला सरकार जबाबदार असल्याचे सांगून भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक अधिकारी नेते मंत्री अडकले आहेत त्याचे व्हिडीओ असल्यामुळे त्यांना राजकीय दृष्टीने ब्ल्याकमेल केले जाऊ शकते अशी भीती सरकार ला वाटते या तपासाला गती देणारे पोलीस प्रशासन जबाबदार आहॆ गुह खाते स्वतंत्र असावे हि आमची मागणी आहॆ महामानव बद्दल कोणी अपशब्द बोलत असेल तर त्यांचे विरोधात लगेच कठोर कारवाई होण्यासाठी कायदा करा, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बळकट करण्यासाठी भोंदू बाबा नां कठोर शिक्षा झालीच पाहिजे शक्ती कायदा जलद गतीने कारवाई होत नसल्याने महिला मुलीवर अत्याचार वाढले आहॆ भविष्यात दोन्ही पवार गट एकत्र तेव्हाच येतील जेव्हा अजितदादा चा गट भाजपा ची साथ सोडेल अन्यथा बारामती त दोन्ही गट एकमेकाच्या विरोधात लढतील असे त्यांनी स्पष्ट केले