शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी आ. सुमित वानखेडे सरसावले

नादुरुस्त कालव्यांचा प्रश्न मार्गी, पाण्याचा अपव्यय थांबणार

    दिनांक :07-May-2026
Total Views |
आर्वी, 
mla sumit wankhede शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी सिंचन आणि पाणी नियोजनाचे महत्त्व ओळखून आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारण कामांचे दिमाखात भूमिपूजन झाले. जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेतून (२०२५-२६) गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सावंगी (पोळ), धानोडी (बहा.), रेवती आणि कवाडी या गावांमधील सिमेंट नाला बांधांची दुरुस्ती व नाला खोलीकरणाच्या ११ महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.
 

mla sumit wankhede 
 
 
शेतकर्‍यांच्या पिकांसाठी पाणी हा मुख्य आधार आहे. मात्र, अनेक ठिकाणी जुने कालवे व नाला बांध नादुरुस्त झाल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुमित वानखेडे यांनी या कामांसाठी विशेष पाठपुरावा केला होता. आता या कामांमुळे नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती होऊन पाण्याचा अपव्यय थांबेल आणि शेतकर्‍यांना विनासायास सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. नादुरुस्त संरचनेमुळे शेतकर्‍यांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास आता कायमचा कमी होणार आहे.
या कामांच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन होईल.mla sumit wankhede ज्याचा थेट फायदा रबी व खरीप अशा दोन्ही हंगामातील पिकांना होणार आहे. शेतकर्‍यांना सिंचनासाठी सक्षम करणे हे आमचे प्राधान्य असून, या जलसंधारण कामांमुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती होईल, असा विश्वास आमदार वानखेडे यांनी यावेळी व्यत केला. या विकासकामांच्या नियोजनामुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यत केले जात आहे.
याप्रसंगी भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी आणि परिसरातील शेतकर्‍यांची उपस्थिती होती.