ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींचा पाकला अप्रत्यक्ष इशारा

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Modi's indirect warning to Pakistan पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक माध्यमावरील आपल्या खात्याचा छायाचित्र बदलत पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा रंगली आहे. या निमित्ताने केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांनीही आपल्या खात्यांवरील छायाचित्रांमध्ये बदल करून भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, निर्मला सीतारामन आणि अश्विनी वैष्णव यांनीही या मोहिमेच्या स्मरणार्थ आपली छायाचित्रे बदलली.
 
 
modi and operation sindoor
 
 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात ‘ऑपरेशन सिंदूर’ला भारतीय सशस्त्र दलांच्या अद्वितीय शौर्य, धैर्य आणि देशनिष्ठेचे प्रतीक म्हटले. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या जवानांच्या पराक्रमाचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दिलेले प्रत्युत्तर हे दहशतवाद्यांसाठी ठोस संदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही या मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय लष्कराच्या धैर्याचे कौतुक केले. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी जवानांनी दिलेले योगदान अमूल्य असल्याचे सांगत, देशावर संकट आले की भारतीय सैन्य निर्णायक पावले उचलण्यास नेहमीच सज्ज असते, असे त्यांनी म्हटले. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका चित्रफितीत दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका अधिक कठोरपणे मांडण्यात आली आहे.