अनिल कांबळे
नागपूर,
pregnant by stepson मायलेकाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना मानकापुरात उघडकीस आली. विवाहित महिलेवर सावत्र मुलानेच जीवे मारण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केला.त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती झाली. ही घटना पाेलिस ठाण्यापर्यंत पाेचल्यानंतर आई आणि मुलाचे नाते कलंकित झाले आहे.
पाेलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पीडित 22 वर्षीय महिला सध्या चार महिन्यांची गर्भवती आहे. 2024 मध्ये तिची एका खासगी बँकेत व्यवस्थापक असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीशी ओळख झाली. नाेकरीच्या निमित्ताने दाेघांमध्ये जवळीक वाढली. ताे तिला आर्थिक मदत करीत हाेता. तसेच तिचे शाैकही पूर्ण करीत हाेता. त्या गाेष्टीवर भाळलेल्या तरुणीने 55 वर्षीय बँक व्यवस्थापकाशी मंदिरात गुपचूप विवाह केला. संबंधित व्यक्तीला पहिल्या पत्नीपासून 21 वर्षीय मुलगा आहे. ताे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ही बाब पतीने तिच्यापासून लपवून ठेवली हाेती. मात्र, ताे गेल्या काही महिन्यांपूर्वी अचानक घरी आला. त्याने स्वतःची ओळख मुलगा असल्याचे दिली. त्यानंतर ताे वडिल आणि सावत्र आईसाेबतच राहू लागला.pregnant by stepson यादरम्यान, त्याची नजर सावत्र आईवर गेली. ती घरी एकटी असताना सावत्र मुलगा सातत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवायला लागला. पीडित महिलेने घडत असलेला हा प्रकार पतीला सांगितला. कुटुंबाची बदनामी हाेईल या भीतीने तिला तक्रार न करण्याचा सल्ला पतीने दिला. सावत्र मुलाच्या सततच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून अखेर महिलेने पाेलिसांत धाव घेत तक्रार नाेंदवली. मानकापूर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून सावत्र मुलाचा शाेध सुरू केला आहे.