गमती-जमतीत फेकलेला चाकू घुसला छातीत

    दिनांक :07-May-2026
Total Views |
-बारमधील नाेकराकडून राेखपालाचा खून

अनिल कांबळे
नागपूर, 
Murder नेहमी वादाच्या भाेवऱ्यात असलेल्या धरमपेठेतील टाेकियाे बारमध्ये दाेन कर्मचाऱ्यांमधील सुरु असलेली गंमत जम्मत एकाच्या जीववर बेतली.नाेकराने गमतीने फेकलेला चाकू थेट राेखपालाच्या छातीत घुसला. चाकू घुसल्याने छातीची धडधड बंद झाली आणि राेखपालाचा मृत्यू झाला. सिताबर्डी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
 
murder
 
Murder  अवधेश कुमार (26, रायबरेली, उत्तरप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. ताे सीताबर्डीतल टाेकियाे बारमध्ये कॅशिअरचे काम करत हाेता. तर आराेपी आयुष नेगी (24, उत्तरांखड) हा तेथे बारटेंडर आहे. गुरुवारी दाेघेही नेहमीप्रमाणे कामावर आले. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ग्राहक कमी असल्याने इतर कर्मचारी व अवधेश तसेच आयुष एकमेकांशी बाेलत हाेते. दाेघांमध्येही गम्मत सुरू हाेती. काही वेळानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्यातूनच दाेघांनीही एकमेकांवर काऊंटरवरील चाकू फेकून मारण्यास सुरुवात केली. बारटेंडर आयुषने लिंबू कापण्याचा व बंद असलेला चाकू अवधेशच्या दिशेने फेकला. ताे चाकू उघडला आणि अवधेशच्या छातीत घुसला. यामुळे बारमध्ये खळबळ उडाली. पाेलिसांनी आयुषला ताब्यात घेतले. या घटनेमुळे पाेलिसदेखील अचंबित झाले आहेत. अवशेधच्या कुटुंबियांना या दुर्दैवी घटनेची माहिती देण्यात आली आहे.
छातीत घुसलेला चाकू घेऊन लागला चालायला
आयुष नेगीने फेकलाला चाकू अवधेशच्या छातीत घुसला. अवधेश ताेच चाकू हाताने पकडून बारच्या बाहेर चालायला लागला. घटनेचे गांभीर्य ओळखून अन्य कर्मचारी त्याच्या पाठीमागे आले. आयुष व इतर कर्मचारी त्याला गाडीतून खासगी रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी अवधेशला मृत घाेषित केले. याची माहिती पाेलिसांना देण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
अवधेश आणि आयुष यांच्यात सुरु असलेल्या गमतीजमतीचा आणि एकमेकांवर चाकू फेकण्याची घटना बारमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. या हल्ल्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे हे हत्याकांड तासाभरात अनेकांच्या माेबाईल पाेहचल्याची माहिती आहे.