प्रेमाच्या त्रिकाेणातून युवकाचा खून

- इंस्टाग्रामवरील मुलीसाठी दाेघांचा संघर्ष

    दिनांक :07-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
murder इंस्टाग्रामवरुन ओळख झालेल्या मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधाला तिच्या पहिल्या प्रियकराचा विराेध हाेता. मात्र, प्रेमाच्या त्रिकाणातून ठिणगी उडाल्याने एकाने दुसऱ्या युवकाचा चाकूने भाेसकून खून केला. मुस्ता (18, वाजपेयीनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
 
 
murder
 
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताचे एका अल्पवयीन मुलीसाेबत प्रेमसंबंध हाेते. मुलीने काही दिवस संबंध ठेवल्यानंतर ती विधी संघर्षग्रस्त बालकाच्या संपर्कात आली. विधी संघर्षग्रस्त मुलासाेबत तिचे सूत जुळले. ही माहिती मुस्ताला समजताच ताे संतप्त झाला. त्यानंतर त्याने विधी संघर्षग्रस्त मुलाला धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात अनेकदा वाद झाले हाेते. परंतु, पाेलिसात तक्रारी केल्या नव्हत्या. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास विधी संघर्षग्रस्त मुलाने मुस्ताला न करून वाजपेयीनगर येथील एका धार्मिकस्थशळामागील मैदानात भेटायला बाेलवले.murder मुस्ता तेथे गेले असता विधी संघर्षग्रस्त मुलगा व त्याच्या साथीदाराने मुस्ताच्या गळ्यावर, डाेक्यावर, कानाजवळ तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार केले. याप्रकरणी कळमना पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून एका मुलाला ताब्यात घेतले आहे.