नागपूर विभागाची उल्लेखनीय कामगिरी
नागपूर,
Nagpur Division Ticket Inspection Income नागपूर विभागाने एप्रिल २०२६ मध्ये तिकीट तपासणीद्वारे ३.९१ कोटींचे उत्पन्न मिळवून एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला आहे. एप्रिल २०२५ च्या तुलनेत या उत्पन्नात तब्बल ८१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी विभागातील तपासणी तसेच सहाय्यक पथकांच्या समन्वित आणि समर्पित प्रयत्नांचे फलित आहे. फ्लाइंग स्क्वॉड, अमेनिटी स्क्वॉड तसेच स्टेशन स्क्वॉड, स्पोर्ट्स स्क्वॉड यांच्या सक्रिय योगदानामुळे हे उत्कृष्ट यश शक्य झाले.
Nagpur Division Ticket Inspection Income विभागातील अनेक कर्मचार्यांनी वैयक्तिक स्तरावर महिनाभरात ३ लाखांपेक्षा अधिक तिकीट तपासणी उत्पन्न मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः आलोक झा, एचडी टीई, यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. त्यांनी एप्रिल महिन्यात १,३६४ प्रवाशांकडून ९.६१ लाखांची प्रभावी वसुली केली. दररोज सरासरी सुमारे ५२ प्रवाशांची तपासणी करत त्यांनी प्रतिदिन अंदाजे ३६,९६० इतकी सरासरी वसुली नोंदवली. ही कामगिरी नागपूर विभागातील वाणिज्य व तिकीट तपासणी कर्मचार्यांची सतर्कता, कर्तव्यनिष्ठा आणि संघभावना अधोरेखित करते.