मेट्रोच्या खापरी ते बुटीबोरी दरम्यान गर्डर लॉन्चिंगच्या कामास सुरुवात

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur Metro Khapri महा मेट्रोच्या - २ अंतर्गत वर्धा मार्गावरील खापरी ते बुटीबोरी दरम्यान गर्डर लॉन्चिंगच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर मेट्रोने आता चारही बाजूने कामाचा वेग वाढविला असल्याची माहिती मेट्रोचे जनसंपर्क प्रमुख अखिलेश हळवे यांनी दिली आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत सेगमेंट बॉक्स गर्डरचे लॉन्चिंगचे कार्य अतिशय कठीण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक कार्य मानले जाते. असे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक संख्येने लॉन्चर्सची उपलब्धता अत्यावश्यक असते.
 
 
khapari-metro
आतापर्यंत १५ लॉन्चर्स कार्यान्वित
महा मेट्रोने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत खापरी ते बुटीबोरी ईएसआर मेट्रो स्टेशन दरम्यानच्या मार्गावर आता ५व्या लॉन्चिंग गर्डरच्या कार्यास सुरुवात केली आहे. नागपूर मेट्रोने आतापर्यंत एकूण १५ लॉन्चर्स कार्यान्वित केले असून ही एक विक्रमी होय. यात प्रामुख्याने रीच-१ मध्ये ५, रीच-२ मध्ये ५, रीच-३ मध्ये २ आणि रीच-४ मध्ये लॉन्चर्सचा समावेश आहे. खापरी — बुटीबोरी सेक्शन मध्ये हे पाचवे लॉन्चिंग गर्डर आहे.
उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार
Nagpur Metro Khapri  औद्योगिक आणि शहरी भागांतील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण कॉरिडॉर शाळा व रुग्णालयांपर्यंत सहज पोहोचण्याकरिता तसेच दक्षिणेकडील भागांशी उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. रीच-१अ कॉरिडॉरमध्ये एकूण ६०८ व्हायाडक्ट स्पॅन्सचा समावेश असून ४३९ सेगमेंटल गर्डर स्पॅन्स, १६६ आय-गर्डर स्पॅन्स, नागपूर ते वर्धा रेल्वेमार्गावर अनुक्रमे ७९ मीटर आणि १०० मीटर लांबीचे दोन विशेष स्पॅन्स तसेच नदी वर एक स्टील गर्डर स्पॅनचा समावेश आहे.