निरामय संस्थेची करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नागपूर,
Niramay Service Organization निरामय बहु-उद्देशीय सेवा संस्था तर्फे दहावी व बारावी उत्तीर्ण ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नुकतीच करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी श्रीप्रकाश पंडा यांनी प्रमुख पाहुणे डॉ. दिनेश तसेच मान्यवर मार्गदर्शक डॉ. जुगल किशोर अग्रवाल आणि अंबरीष पुसदकर यांचे स्वागत केले. पहिल्या सत्रात डॉ. जुगल किशोर अग्रवाल यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व स्पष्ट करत योग्य करिअर निवडीसोबत उत्तम व्यक्तिमत्त्व हे यशस्वी जीवनाचे आधार असल्याचे सांगितले. त्यानंतर Erehwon Technologies चे संस्थापक अंबरीष पुसदकर यांनी संवादात्मक सत्रातून विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर विचार करण्याची प्रेरणा दिली.यानंतर आयटी इंजिनिअर व डिजिटल मार्केटर सारंग आंबटकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांच्या आगामी Zentrixio स्टार्टअपच्या माध्यमातून डिजिटल युगातील संधी आणि आव्हाने यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
 
 
pusad
 
 
निशांत झोड यांनी “दहावी व बारावीनंतर काय?” या विषयावर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, सेवा व शासकीय क्षेत्रातील करिअर संधींबाबत माहिती दिली.Niramay Service Organization विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारून विविध शंकांचे निरसन करून घेतले.संस्थापक अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी करिअर म्हणजे केवळ नोकरी नसून समाजाच्या गरजा ओळखून त्यावर काम करण्याची संधी असल्याचे सांगितले. शेवटच्या प्रेरणादायी सत्रात डॉ. दिनेशजी यांनी देशभक्ती, संस्कार, कुटुंबमूल्ये आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
सौजन्य:प्रज्ञा पुसदकर,संपर्क मित्र