केंद्रीय मंत्री नितीन यांना स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार

    दिनांक :07-May-2026
Total Views |
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १० मे रोजी
 
नागपूर, 
पायाभूत सुविधा विकास आणि लोककल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांना स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार रविवार, १० मे रोजी दुपारी वाजता द बॅनियन हॉल, चिटणवीस सेंटर येथे होणार असून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 
 
nitin ji
 
पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष
मुख्यत: संशोधन, जनजागृती आणि विविध घटकांमधील समन्वय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च, नागपूर’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे दिला जाणारा भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार २०२६’जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून स्व. भाऊसाहेब चांद्रायण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन जगलेल्या भाऊसाहेबांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन होणार
Nitin Gadkari  पुरस्कार प्रसंगी त्यांचे नातू डॉ. कपिल डी. चांद्रायण लिखित स्व. भाऊसाहेब चांद्रायण यांच्या संक्षिप्त चरित्र आणि आठवणींवर आधारित पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. सन २०२५ हे स्व. भाऊसाहेब चांद्रायण यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभाचे वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विकास, संशोधन सार्वजनिक जीवन या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. समाजावर सकारात्मक आणि अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करणार्‍या तसेच राष्ट्र व समाजाच्या विकासासाठी कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान या पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे.