अप्पर वर्धाची पाईपलाईन फुटली

    दिनांक :07-May-2026
Total Views |
आज व उद्या पाणी पुरवठा बंद
दुरूस्तीच्या कामाला सुरूवात
 
नांदगाव पेठ, 
pipeline burst अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी अप्पर वर्धा धरणाची मुख्य पाईपलाईन माहुली जहागीर गावाजवळ फुटल्याने गुरुवारी हजारो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून गेले. सकाळपासूनच पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू असताना दुपारपर्यंत एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा ८ व ९ मे रोजी बंद राहणार असल्याचे जीवन प्राधिकरणच्या वतीने कळविण्यात आले आहे.
 
 
pip
 
मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. प्रचंड दाबाने पाणी बाहेर पडत असल्याने परिसरात तलावासारखे दृश्य निर्माण झाले होते. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि पाण्याच्या टंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित केले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळीच पाईपलाईन फुटल्याचे लक्षात आले होते. मात्र अनेक तास कोणतीही यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नाही. दुपारनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा हालचालीत आली आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. तरीही सायंकाळपर्यंत पाण्याचा वेग कमी झाला नव्हता.
 
 
pipeline burst  दरम्यान, पाईपलाईन फुटल्यामुळे ८ व ९ मे रोजी संपूर्ण अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे जीवन प्राधिकरणकडून कळविण्यात आले आहे. गळती दुरुस्तीचे काम युद्धा स्तरावर पूर्ण करण्यात येऊन अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा त्वरित पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मजीप्रातर्फे करण्यात आले आहे. आधीच अनियमित पाणीपुरवठ्याने त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.