खरीप हंगामात शेतीसाठी पाण्याचे नियोजन करा : पालकमंत्री नाईक

गोंदियात खरीप हंगाम आढावा सभा संपन्न

    दिनांक :07-May-2026
Total Views |
गोंदिया,
guardian minister naik यावर्षीच्या अंदाजीत पर्जन्यमानानुसार पावसाचे पाणी कमी येणार असल्याचे वर्तविल्या जात आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी ६ मे रोजी खरीप हंगाम पूर्वी आढावा बैठक सभेत दिले. पालकमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
 

guardian minister naik 
 
 
यावेळी बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, खासदार नामदेव किरसान, आमदार विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जि. प. सभापती दिपा चंद्रिकापुरे, जि.प. सभापती लक्ष्मण भगत, जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुग्णांथम, अति. मु. का. अ. तानाजी लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, आत्माचे प्रकल्प संचालक अजित अडसूळे तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. खरीप हंगामात जिल्ह्यात भात, तुर, तीळ, मका, हरभरा, जवस, मोहरी आणि भाजीपाला ही पिके घेतली जात असून वर्ष २६- २७ मध्ये २०,३२०९ हेक्टर जमिनीवर खरीपाची पेरणी प्रस्तावित आहे. तेव्हा पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर यावेळी सांगण्यात आले. प्रसंगी नाईक यांनी नुकतेच आलेल्या अवकाळी पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. खरीप हंगामात घेणार्‍या पिकांसाठी ५६ हजार ९४६ क्विंटल बियाण्याची गरज प्रस्तावित असून याबाबत शेतकर्‍यांना कुठल्याही अडचण येणार नाही आणि निर्धारित दरावर त्यांना बियाणे मिळतील याची तपासणी योग्य प्रमाणे करावी, असे सांगून खतांचा काळाबाजार आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.guardian minister naik युरिया डी ए पी सारख्या खतांबरोबर दुसरे खत व औषधी घेण्यास भाग पाडत असल्यास स्पष्ट नकार देऊन शेतकर्‍यांनी शासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले.
५० हजार शेतकर्‍यांना पिक विमा योजनेचा लाभ ...
२०२५ मध्ये भात पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून ५६ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ५० हजार शेतकर्‍यांना पिक विमा योजनेअंतर्गत ३८.४१कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला. ही मदत शेतकर्‍यांना अडचणीच्या वेळी उपयोगी ठरते. त्यामुळे पीक विमा काढावा असे नाईक यांनी यावेळी सांगितले.