भारत काहीही विसरत नाही! बघा दमदार व्हीडिओ

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
powerful message from the Indian Air Force भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त एक विशेष दृश्यफीत प्रसिद्ध करत देशाला त्या निर्णायक लष्करी कारवाईची आठवण करून दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांत भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तराचे चित्रण या दृश्यफितीत करण्यात आले असून, त्यातून भारतीय हवाई दलाची तयारी, अचूक नियोजन आणि लक्ष्यभेदी कारवाई अधोरेखित करण्यात आली आहे. ही दृश्यफीत पहाटे १ वाजून ५ मिनिटांनी हवाई दलाच्या अधिकृत सामाजिक माध्यम खात्यावर प्रसिद्ध करण्यात आली. याच वेळी दहशतवादी तळांवर पहिला हल्ला करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. या दृश्यफितीत लष्करी मोहिमेतील महत्त्वाचे क्षण, जवानांची सज्जता आणि हवाई कारवाईतील अचूकता दाखवण्यात आली आहे.
 
 
 
sindur
हवाई दलाने या संदेशातून भारत दहशतवादी कारवाया विसरत नाही आणि देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिल्याचे मानले जात आहे. सामाजिक माध्यमांवरील संदेशात ‘ऑपरेशन सिंदूर’ने न्याय मिळवून दिला असून ही मोहीम देशाच्या स्मरणात कायम राहील, असे नमूद करण्यात आले आहे.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने तातडीने हालचाली करत अवघ्या ८८ तासांत ही मोहीम राबवली होती. या कारवाईदरम्यान पाकिस्तानातील दहशतवादी तळ आणि त्यांच्याशी संबंधित जाळे लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यान, भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केलेली ही दृश्यफीत सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाहिली जात असून नागरिकांकडून जवानांच्या शौर्याचे कौतुक केले जात आहे. या माध्यमातून भारतीय लष्कराचे मनोबल आणि देशाच्या सुरक्षेबाबतची ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.