तमिळनाडूत खळबळ: काँग्रेसचा विजयच्या 'TVK'ला पाठिंबा, DMK कडून निषेध!

    दिनांक :07-May-2026
Total Views |
चेन्नई,
dmk-congress-tvk : तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अभिनेता विजय याच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचा जुना आणि विश्वासू मित्रपक्ष असलेल्या द्रमुक (DMK) ने या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसचा निषेध केला आहे.
 
 
 
dmk-congress-tvk
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी राजकीय गणिते पाहता काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे मित्रपक्षांमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. द्रमुकने काँग्रेसवर टीका करताना म्हटले आहे की, इतकी वर्षे सोबत असताना काँग्रेसने अशा प्रकारे नवीन पक्षाला पाठिंबा देणे हा एक प्रकारचा विश्वासघात आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील सत्ताधारी आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला असून याचे पडसाद आगामी निवडणुकांवर पडण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे, थलपती विजयच्या पक्षाला मिळालेल्या या अनपेक्षित पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसच्या या पावलामुळे तमिळनाडूतील पारंपारिक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, आता द्रमुक आपली पुढची रणनीती कशी आखते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या राजकारणात 'जुना मित्र की नवा भिडू' या संघर्षाने आता चांगलीच धार पकडली आहे.