१०० टक्के निकालाची परंपरा कायम

आर. एस. मुंडले कनिष्ठ महाविद्यालय

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नागपूर,
R. S. Mundley English School पश्चिम नागपूरातील समर्थ नगर येथील आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय ने यंदाही इयत्ता बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान श्रेयसी आर्वीकर हिने पटकावला, तर द्वितीय क्रमांक श्रेयस खेकाळे याने मिळविला. विशेष म्हणजे श्रेयस खेकाळे याने संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले आहेत.
 
kok
 
 
धरमपेठ शिक्षण संस्था  अध्यक्ष ॲड. उल्हास औरंगाबादकर तसेच संस्थेच्या कार्यकारिणीने मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी, पर्यवेक्षिका अमृता नगरकर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.“विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हे यश कायम राहील,” असे गौरवोद्गार मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी यांनी काढले. निकालानंतर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
सौजन्य : प्रीती लांबे ,संपर्क मित्र