पाेलिसात तक्रार केली म्हणून बलात्काराची धमकी

    दिनांक :07-May-2026
Total Views |
-पतीला मारहाण : पाेलिसांचा वचक संपला ?

अनिल कांबळे
नागपूर, 
Rape threat राज्यात महिला व मुलींना सुरक्षित वातावरण निर्माण करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न सुरु असतानाच पाेलिस मात्र अजुनही गंभीर नाहीत. महिलांच्या सुरक्षेबाबत पाेलिसांना चिंता नसल्याची एक घटना उघडकीस आली. एका महिलेने वस्तीतील दाेन तरुणांविराेधात पाेलिसांत तक्रार केल्यामुळे एका तरुणाने तिला शिवीगाळ करत घरात शिरून अत्याचार करण्याची धमकी दिली. तसेच तिला बेदम मारहाण करत तिचे कपडेदेखील फाडले. गिट्टीखदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. निर्भय हाेऊन तक्रार द्या असा दावा करणाèया गिट्टीखदान पाेलिसांच्या प्रतिमेला या घटनेमुळे तडा गेला आहे. शहरात पाेलिसांचा वचक संपला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
 
marhan
 
Rape threat  विक्की महादेवराव पांडे (42, सुरेंद्रगड) असे आराेपीचे नाव आहे. संबंधित महिलेला त्याच्या दाेन मित्रांनी शुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली हाेती. त्यामुळे महिलेने त्यांच्याविराेधात तक्रार केली हाेती. बुधवारी साडेनऊ वाजताच्या सुमारास विक्की महिलेच्या घरासमाेर दारूच्या नशेत गेला व तिला शिवीगाळ करू लागला. ‘तू मला न विचारता दाेन्ही तरुणांविराेधात पाेलिस तक्रार का केली’ अशी त्याने विचारणा केली. त्यानंतर त्याने घरात शिरून महिलेला लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली. तसेच तिला मारहाण करत तिचे कपडे ाडले. तिच्या पतीने धाव घेतली असता विक्कीने टाेकदार वस्तूने त्याच्या पाठीत वार केला व मारहाण केली. त्याने दाेघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. भर वस्तीसमाेर हा प्रकार झाल्याने महिला हादरली. तिने हिंमत दाखवून पाेलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पाेलिसांनी विक्कीविराेधात गुन्हा दाखल केला आहे.