दरोडेखोरांचा डाव हाणून पाडला

    दिनांक :07-May-2026
Total Views |
तिघे अटक, पाच जण फरार
मंगरूळ पोलिसांची धाडसी कारवाई
 
धामणगाव रेल्वे, 
Robbers' plot foiled शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी ताब्यात घेतले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाणे हद्दीमध्ये ६ मे रोजी रात्री ठाणेदार आपल्या कर्मचार्‍यांसह गस्त घालत असतांना, ग्राम आष्टा शेतशिवारात मंगरुळ दस्तगीर रोडवर, हंसराज जाधव यांच्या शेताजवळ, काही इसम रोडलगत तीन चारचाकी वाहन व एक दुचाकी वाहन लावून, संशयास्पद संशयास्पद स्थितीत लपून बसले असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता तीन इसम हाती आले तर अन्य ५ जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
 
 
Aropidsl
 
Robbers' plot foiled  ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये २८ वर्षीय रवी रुपराव मेश्राम, २८ वर्षीय अमित गणेश चौधरी रा. पुलगाव व ३९ वर्षीय मंगेश श्रावण मेश्राम, रा. आष्टा यांचा समावेश आहे. फरार आरोपींमध्ये राज नहारकर, रा. पुलगांव, मंगेश सुखलाल ठाकरे, रा. मंगरुळ दस्तगीर, आदेश नाकाडे, रा. मंगरुळ दस्तगीर व चेतन मोहोळे, रा. झाडा व आणखी एक इसम यांचा समावेश आहे. वाहनांची झडती घेतली असता त्यात २ तलवारी, १ फरश्या, ४ चाकू, २ स्टीलचे रॉड, ३ लाकडी बाशाच्या काठ्या व मिरची पुड असे साहित्य आढळले. आपण दरोडा घालण्याच्या तयारी असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांच्या विरोधात मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार शरद अहेर यांच्या नेतृत्वात सहदेव राठोड, सतीश ठवकर, अमर वाघमारे, अमोल हिवराळे, जीवन लांडगे, स्वप्निल चिंचखेडे, अविनाश राठोड, संदीप पाटील, जय गवई, प्रभू राठोड यांनी केली.